BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : चायनीज मंच्युरियन खायला न दिल्याने तरुणावर चाकूने वार

एमपीसी न्यूज – चायनीज मंच्युरियनच्या गाडीवर विक्रेत्याने एकाला चायनीज मंच्युरियन खायला न दिल्याने तरुणावर चाकूने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 11) दुपारी साडेचारच्या सुमारास मोरवाडी मधील अजमेरा गार्डन येथे घडली.

कामाल मोर्तुज शेख (वय 18, रा. नाणेकर चाळ, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार केशव सतीश पवार (रा. लालटोपीनगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख याचा अजमेरा गार्डन समोर चायनीज मंच्युरियनची गाडी आहे. मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास केशव शेख याच्या गाडीवर चायनीज खाण्यासाठी आला. केशव याला शेख याने चायनीज मंच्युरियन खायला दिले नाही.

या रागातून केशव याने त्याच्या हातातील चाकूने शेख याच्या गालावर वार केले. यामध्ये शेख गंभीर जखमी झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

.