Pimpri : शहराचा गुरुवारी संध्याकाळी पाणीपुरवठा बंद राहणार

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विदयुत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे, सेक्टर क्र.२३ निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रातील वियुत पुरवठा विषयक व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करणे, तसेच शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असल्यामुळे गुरूवारी (27 जून) संध्याकाळी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.

महापालिकेतर्फे गुरूवारी सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यानंतर दुरूस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. बुधवारी आणि शुक्रवारी दुपारी/संध्याकाळी पाणी कपातीमुळे पाणी बंद असणाऱ्या भागास त्या त्या दिवशी नियमित पाणी पुरवठा केला जाईल.

  • दुरूस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार असल्याने शहरातील सर्व भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवार (28 जून) होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे, असे महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

सर्व नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करुन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने कऱण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.