Pimpri : शहरात आज 748 नवीन रुग्णांची नोंद, 727 कोरोनामुक्त, तर 20 मृत्यू

शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 23 हजार 682 वर पोहोचली आहे. : The city recorded 748 new patients today, 727 coronary free, while 20 died

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 748 जणांचे आज  (सोमवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 727  जणांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 23 हजार 682 वर पोहोचली आहे.

आज  20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.   भोसरीतील 55 वर्षीय महिला, 60, 90 वर्षीय पुरुष, दापोडीतील 60 वर्षीय महिला तर 70, 72 वर्षीय दोन पुरुष,  सांगवीतील 92 वर्षीय वृद्ध,  27 वर्षाचा युवक, पिंपरीतील 67 वर्षीय महिला, 58 वर्षीय पुरुष, पिंपळेगुरव येथील 30 वर्षाचा युवक, 61 वर्षीय पुरुष, थेरगावातील 49, 59, 66 वर्षीय पुरुष, काळेवाडीतील 65 वर्षीय पुरुष, निगडीतील 64 वर्षीय पुरुष, फुगेवाडीतील 59 वर्षीय महिला,  माण येथील 68 वर्षीय पुरुष आणि  फुरसुंगी येथील 71 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 23 हजार  682 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 16, 206 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 395 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 94 अशा 489 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 3895 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 770

# पॉझिटीव्ह रुग्ण – 748

#निगेटीव्ह रुग्ण – 54

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण -1239

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 3895

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 24

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या -23,682

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 3895

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 489

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या -16,206

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 22149

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 71288

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.