Pimpri: शहरात आज 919 नवीन रुग्णांची नोंद, 167 जणांना डिस्चार्ज, 16  मृत्यू

The city recorded 919 new patients today, 167 discharged, 16 deaths : शहरातील रुग्णसंख्या 20 हजार 317 वर पोहोचली आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 886 आणि शहराबाहेरील 33 अशा 919 जणांचे रिपोर्ट आज (गुरुवारी) पॉझिटीव्ह आले आहेत. मागील काही दिवसानंतर आज एक हजाराच्या आत रुग्ण सापडले आहेत.  तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 167 जणांना आज घरी सोडण्यात आले.  दरम्यान, शहरातील रुग्णसंख्या 20 हजार 317 वर पोहोचली आहे.

आज 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पिंपरीतील 55 वर्षीय महिला, पिंपळेगुरव 75 वर्षीय महिला, चिखलीतील 42, 51, 66  वर्षीय असे तीन पुरुष,  मोरवाडीतील 57 वर्षीय पुरुष, काळेवाडीतील 65, 62 वर्षीय दोन पुरुष,  थेरगावातील 36 वर्षाचा युवक, पिंपरी, संत तुकारामनगर येथील 74 वर्षीय वृद्ध,  मोशीतील 70 वर्षीय वृद्ध, रुपीनगर येथील 41 वर्षीय पुरुष,  चिंचवडगावातील 75 वर्षीय महिला,  नेहरुनगरमधील 75 वर्षीय वृद्ध, विद्यानगर चिंचवड येथील 55 वर्षीय पुरुष, निगडीतील 41 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 20 हजार 371 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 12445  जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील  327 जणांचा तर शहराबाहेरील परंतु महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 82 अशा 409 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या  3303 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 4437

# पॉझिटीव्ह रुग्ण -919

#निगेटीव्ह रुग्ण – 3624

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण -1326

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 3303

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 3917

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या -20,317

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 3303

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या -409

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या -12445

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 25541

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 84027

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.