Pimpri: शहरात आज 716 नवीन रुग्णांची नोंद, 398 जणांना डिस्चार्ज, 21 मृत्यू

Pimpri chinchwad Corona Update todays News Corona Patients discharg death

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 677 आणि शहराबाहेरील 39, अशा एकूण 716 जणांना आज (गुरुवारी) कोरोनाची लागण झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 398 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील रुग्णसंख्या 13 हजार 784 वर पोहोचली आहे.

आज 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. थेरगावातील 51 वर्षीय महिला, मोशीतील 55 वर्षीय महिला, चिखलीतील 57 वर्षीय पुरुष, भोसरीतील 65, 78, 83 वर्षीय वृद्ध, 53 वर्षीय महिला, चिंचवड येथील 64 वर्षीय पुरुष, आकुर्डीतील 85 वर्षीय वृद्ध, पिंपळे सौदागर येथील 52 वर्षीय पुरुष, काळेवाडीतील 69 वर्षीय वृद्ध महिला, पिंपरीतील 68 वर्षीय पुरुष, 60, 60 वर्षाच्या दोन महिला, वाकड येथील 70 वर्षीय वृद्ध, 58 वर्षीय पुरुष, तळवडेतील 59 वर्षीय पुरुष आणि चाकण येथील 76 वर्षीय वृद्ध, 39 वर्षीय युवक, देहूरोड येथील 53 वर्षीय पुरुष, खडकीतील 78 वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 13 हजार 784 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 9049 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 255 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 67 अशा एकूण 322 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 3447 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 3389

# पॉझिटीव्ह रुग्ण -716

#निगेटीव्ह रुग्ण – 2857

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 1917

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 3447

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 3264

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या -13,784

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 3447

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या -322

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या -9049

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 27018

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 87693

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.