Pimpri: शहरात आज 798 नवीन रुग्णांची नोंद, 301  जणांना डिस्चार्ज, 16 मृत्यू

शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 25 हजार 106 वर पोहोचली आहे. : The city today recorded 798 new patients, 301 discharges, 16 deaths

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 795 आणि शहराबाहेरील 3 अशा 798 जणांचे आज (बुधवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 301  जणांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 25 हजार 106 वर पोहोचली आहे.

आज  16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुनावळेतील 68 वर्षीय पुरुष, दापोडीतील 30 वर्षीय महिला, भोसरीतील 75 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, कासारवाडीतील 63 वर्षीय पुरुष,   पिंपळेगुरव येथील 98, 77 वर्षीय वृद्ध,   50,  45 वर्षीय पुरुष असे चार जण, मोशीतील 53 वर्षीय महिला, सांगवीतील 53 वर्षीय पुरुष, निगडीतील 57 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 60 वर्षीय पुरुष,  आकुर्डीतील 63 वर्षीय महिला, किवळेतील 72 वर्षीय पुरुष आणि  चाकण येथील 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 25 हजार  106 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 17, 407 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 423 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 98 अशा 521 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 3970 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 1419

# पॉझिटीव्ह रुग्ण – 798

#निगेटीव्ह रुग्ण – 192

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण -1671

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 3970

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 1346

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या -25,106

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 3970

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 521

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या -17,407

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 22214

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 72559

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.