Pimpri: शहरात आज 843 नवीन रुग्णांची नोंद, 538 जणांना डिस्चार्ज, 12 मृत्यू

The city today recorded 843 new patients, 538 discharges, 12 deaths : शहरातील रुग्णसंख्या 14 हजार पार झाली असून 14 हजार 590 वर पोहोचली आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 806 आणि शहराबाहेरील 37 अशा 843 जणांना आज (शुक्रवारी) कोरोनाची लागण झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 538 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील रुग्णसंख्या 14 हजार पार झाली असून 14 हजार 590 वर पोहोचली आहे.

शहरातील दहा दिवसांचा लॉकडाउन काल संपला. लॉकडाउनमध्ये तब्बल साडे हजार रुग्णांची वाढ झाली होती. आजपासून अनलॉक सुरु आहे.

लॉकडाउन उठल्यानंतर लॉकडाउनचा परिणाम दिसेल असा दावा प्रशासनाने केला होता. परंतु, अनलॉकच्या पहिल्यादिवशी तब्बल 843 नवीन रुग्णांची भर पडली आहे.

आज 12 जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपळेसौदागर येथील 52 वर्षीय पुरुष, मोशीतील 75 वर्षीय वृद्ध, उद्यमनगर येथील 51 वर्षीय पुरुष, तळवडेतील 66, 59 वर्षीय असे दोन पुरुष, मोहननगर येथील 62 वर्षीय पुरुष, पिंपळेगुरव येथील 32 वर्षाचा युवक, आकुर्डीतील 59 वर्षीय महिला, चिंचवड येथील 65 वर्षीय पुरुष, रावेत येथील 70 वर्षीय वृद्ध आणि देहूरोडमधील 52 वर्षीय पुरुष, चाकण येथील 65 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 14 हजार 590 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 9587 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 265 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 69 अशा 334 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 3289 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 3973

# पॉझिटीव्ह रुग्ण -843

#निगेटीव्ह रुग्ण – 2521

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 2563

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 3289

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 3980

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या -14, 590

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 3289

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या -334

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या -9587

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 26,748

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 88,852

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.