Pimpri: शहरात आज 497 नवीन रुग्णांची भर, 168 जणांना डिस्चार्ज, 8 जणांचा मृत्यू

The city today saw an increase of 497 new patients, 168 discharges, 8 deaths :आजपर्यंतची रुग्णसंख्या 6549 वर पोहोचली

एमपसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. शहराच्या विविध भागातील 488 आणि शहराबाहेरील 9 अशा 497 जणांना आज (शुक्रवारी) कोरोनाची लागण झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 168 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आजपर्यंतची रुग्णसंख्या 6549 वर पोहोचली आहे.

आज एकाचदिवशी शहरातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. नेहरूनगर येथील 82 वर्षीय वृद्ध महिला, नेहरूनगरमधीलच 60 वर्षीय महिला, चिंचवडेनगरमधील 80 वर्षीय महिला, पिंपरीगांवातील 61 वर्षीय पुरुष, पिंपळेगुरव येथील 52 वर्षीय पुरुष, आनंदनगर,चिंचवड येथील 42 वर्षीय पुरुष, इंद्रायणीनगर भोसरीतीली 46 वर्षीय महिला आणि मोरेवस्ती, चिखलीतील 47 वर्षीय पुरुष अशा आठ जणांचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला आहे.

शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोमवारपासून पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाऊन केला जाणार आहे. लॉकडाऊनमध्ये कोरोनाची साखळी तुटते का, रुग्णसंख्या कमी होतो का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शहरात आजपर्यंत 6549 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 3849 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 95 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 36 अशा 131 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 2577 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 1415

# पॉझिटीव्ह रुग्ण – 497

#निगेटीव्ह रुग्ण – 923

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 2382

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 3026

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 1064

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 6549

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 2577

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 131

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 3849

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 22907

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 75479

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like