Pimpri: शहरातील दहावीचा निकाल 98.49 टक्के; मुलामुलींची बाजी, निकालात 12 टक्‍क्‍यांनी वाढ

The city's tenth result is 98.49 percent; Boys, girls bets, results increase by 12%

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज (बुधवारी)  ऑनलाइन जाहीर झाला आहे.  शहराचा निकाल यंदा 98.49 लागला. निकालात गतवर्षीपेक्षा 12 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. मुले 98.13 टक्के, तर मुलींचा निकाल 98.89 टक्के लागला. 

शहरात दहावीच्या परीक्षेला 188 शाळांमधून एकूण 18306 विद्यार्थी बसले होते. यामध्ये 9627 मुले व 8679 मुली परीक्षेस बसल्या होत्या. त्यातून 9447 मुले व 8583 मुली उत्तीर्ण झाल्या. एकूण 18030 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

गतवर्षी शहराचा निकाल 86.49 टक्के लागला होता. त्यामुळे यंदा निकालात 12 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे दिसले. गतवर्षी निकालात 7. 84 टक्‍क्‍यांनी घट झाली होती.

मुले 82.62 टक्के व 90.94 टक्‍के मुली उत्तीर्ण झाल्या होत्या. तर 45 शाळांचा निकाल शंबर टक्के लागला होता.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विद्यार्थ्यांची निकाल बघण्यासाठी सायबर कॅफेमध्ये गर्दी केली नाही. लॅपटॉप व मोबाईलवरच बऱ्याच जणांनी निकाल पाहिला.

ज्यांच्याकडे निकाल पाहण्याची सोय नव्हती, अशा विद्यार्थ्यांनी नातेवाईक मित्र मंडळींना फोन करून निकालाची ऑनलाईन प्रत मागितली.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.