BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: महायुतीचे उमेदवार अ‍ॅड. चाबुकस्वार, नगरसेवक कुटे यांच्यावर आचारसंहिताभंगचा गुन्हा!

0

एमपीसी न्यूज – परवानगी न घेता पदयात्रा काढल्याबद्दल शिवसेना-भाजप महायुतीचे पिंपरीचे उमेदवार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद कुटे यांच्यावर आचारसंहिताभंगाचा निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फौजदार संदीप शहाजी ओहोळे यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद कुटे यांनी आकुर्डीगांव, दत्तवाडी या भागात पदयात्रेचे आयोजन केले होते. मात्र, आचारसंहिता सुरू असताना उमेदवाराच्या प्रचारासाठी पदयात्रा काढण्यासाठी निवडणुक विभागाची परवानगी घेणे गरजेचे असताना नगरसेवक कुटे यांनी परवानगी घेतली नाही.

आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल आयोजक कुटे आणि महायुतीचे उमेदवार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांच्यावर कलम 188, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार भोये तपास करत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3