Pimpri: सत्ताधारी नगरसेवकाकडून प्रशासनाचा निषेध!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. अनधिकृत नळजोड कनेक्शन वाढले आहेत. अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट सुरु आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याचा आरोप करत महापौर पदासाठी डावलेले भाजपचे निष्ठावान नगरसेवक नामदेव ढाके यांनी महासभेत प्रशासनाचा निषेध केला. दरम्यान, ढाके बोलत असताना महापौर राहुल जाधव यांनी त्यांना बोलण्यापासून थांबविले. ढाके यांचे भाषण सभेच्या ‘प्रोसिडिंग’मध्ये घेऊ नये, अशी सूचनाही प्रशासनाला केली.

सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न प्रशासन गांभीर्याने घेत नाही. प्रशासनाला नागरिकांच्या प्रश्नांची जाण नाही. नाले झाकले आहेत. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. शहराची वाट लागली आहे. हॉकर्स झोन निश्चित केले जात नाहीत. नदीत जलपर्णी साचली आहे. शहर स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरात काय चालले? हेच कळत नाही, असा आरोप उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी केला.

  • शहरात अनेक समस्या आहेत. प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा प्रशासनावर वचक नाही. आयुक्त निष्क्रिय आहेत. आयुक्तांमध्ये सुधारणा झाली नाही. तर, आयुक्त हर्डीकर यांची बदली करण्याची मागणी नेत्यांकडे केली जाणार असल्याचेही उमहापौर चिंचवडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.