Pimpri: औद्योगिकनगरीत कोरोना बाधितांचे प्रमाण फक्त 0.32 टक्के;  तब्बल 60.87 टक्के रुग्ण बरे

The corona infestation rate in the industrial city is 'only' 0.32 percent; About 60.87 percent of the patients recovered मृत्यूचे प्रमाण अवघे 1.61 टक्के

एमपीसी न्यूज (गणेश यादव) – पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे 25 लाख आहे. त्यापैकी शहरातील 8005 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण होण्याचे हे प्रमाण फक्त 0.32 टक्के आहे. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तब्बल 60.87 टक्के असून सक्रिय रुग्ण 37.51 टक्के आहेत. मृत्यूचे प्रमाण केवळ 1.61 टक्के आहे. राज्याच्या विविध शहराच्या तुलनेत शहरातील लोकसंख्येनुसार लागण होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण सर्वांत कमी आहे. त्यामुळे शहरवासीयांनी कोरोनाला घाबरुन जाण्याचे काही कारण नाही. पण, काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. राज्यातील पहिला रुग्ण आढळल्याने सर्वांचे या शहराकडे लक्ष लागले होते. मार्च, एप्रिल आणि अर्धा मे महिना शहरातील रुग्णसंख्या अतिशय कमी होती.

पण, राज्य सरकारने 22 मे रोजी शहराला रेडझोनमधून वगळले. तेव्हापासून शहरातील रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. आजपर्यंत शहरातील 8005 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

शहरातील लोकसंख्या सुमारे 25 लाख आहे. त्यापैकी 8005 जणांना आजपर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्याचे प्रमाण फक्त 0.32 टक्के आहे.

शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत लागण होण्याचे प्रमाण कमी आहे. तर सक्रिय रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. शहरवासीयांसाठी ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांनी घाबरुन जाण्याचे कोणतेही कारण नाही. पण, काळजी घेणे महत्वाचे आहे. शहरात कोरोनाची गंभीर परिस्थिती नाही.

शहरातील 8005 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 4873 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तब्बल 60.87 टक्के आहे.

तर, आजमितीला 3003 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्याचे प्रमाण 37.51 टक्के आहे.

शहरातील 129 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना लागण झालेल्या व्यक्तीचे मृत होण्याचे प्रमाण केवळ 1.61 टक्के आहे. राज्यातील इतर शहरातील तुलनेत पिंपरी-चिंचवडचा सर्वात कमी मृत्यूदर आहे.

कोणतेही ठोस औषध नसताना अनेक रुग्ण बरे होत आहेत. मृत्यूचे प्रमाणही कमी आहे. कोरोना विरोधात लढणा-या डॉक्टर, नर्स यांच्या प्रशासनाला यश येत आहे.

कोणत्या वयोगटातील कितीजणांना कोरोनाची बाधा ?

कोरोनाने सर्वाधिक विळखा युवकांना घातला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील 22 ते 39 वयोगटातील तब्बल 3160 युवकांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण होण्याचे सर्वाधिक प्रमाण युवकांना आहे.

त्याखालोखाल 40 ते 59 वयवर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 2259 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर 13 ते 21 वयवर्ष असलेल्या 864 तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे.

तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 768 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय 60 वर्षापुढील 946 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

शहरात कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण 0.32 टक्के – आयुक्त

 आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”शहरातील लोकसंख्या 27 लाखाच्या आसपास आहे. दोन लाख नागरिक आपल्या मूळगावी गेले आहेत. त्यामुळे लोकसंख्या 25 लाख आहे. आजपर्यंत शहरातील 8005 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचे प्रमाण फक्त 0.32 टक्के आहे. बाधित रुग्णांपैकी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. शहरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. रुग्णवाढ रोखण्यास आमचे प्राधान्य आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.