Pimpri: पालिका फिल्ड सर्व्हिलन्स टिमसाठी ‘आरटीओ’ची 28 वाहने भाडेतत्वावर घेणार

The corporation will lease 28 RTO vehicles for the field surveillance team : 1 कोटी 22 लाख रुपयांचा खर्च मंजूर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर ‘फिल्ड सर्व्हिलन्स टिम’ तयार करण्यात आल्या असून त्यांना शहरात सर्वत्र फिरण्यासाठी आवश्यक असलेली 28 वाहने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत घेण्यात येणार आहेत.

शासकीय दराने 6 महिन्यांसाठी भाडेतत्वावर घेणेबाबत येणार्‍या 1 कोटी 22 लाख रुपयांच्या खर्चासह विविध विकासकामांसाठी येणा-या 13 कोटी 50 हजार रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीच्या सभेत मान्यता दिली.

पालिकेच्या स्थायी समितीच साप्ताहिक सभा आज (बुधवारी) व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते.

महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करणेबाबत अधिसूचना निर्गमित केलेली आहे.

त्यामुळे पालिकेच्या जलनि:सारण विभागाकडील सन 2019-20 मधील व त्यापूर्वीच्या चालू असलेल्या 99 विकास कामांची बिले 31 मार्च 2020 पर्यंत अदा करणे शक्य झाले नाही. त्या 99 कामांच्या बिलांच्या खर्चासाठी अदा करावयाच्या 12 कोटी 69 लाख रुपयांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली.

पालिकेच्या सारथी प्रणालीसोबत शहरातील नागरिकांना विशेषत: वृद्ध व लहान मुले यांना प्रत्यक्ष दवाखान्यात न जाता त्यांना आजाराबाबत दूरध्वनी/ मोबाइलद्वारे औषधोपचार उपलब्ध करून देणेकामी Virtual OPD For PCMC Citizen या नवीन प्रणालीकरिता 3 महिन्यांसाठी येणार्‍या 29 लाख 50 हजार रुपयांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.