Pimpri : अतिक्रमणांवरील धडक कारवाई तिसऱ्या दिवशीही सुरूच

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri) सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाची धडक कारवाई सलग तिसऱ्या दिवशी सुरू आहे. या कारवाईमध्ये हातगाडी, टपरी, टेम्पो, फ्लेक्स, बॅनर, किऑक्स, जाहिरात बोर्ड, इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच पत्राशेड निष्कासित करण्यात आला.

रहाटणी फाटा, डांगे चौक येथे झालेल्या अतिक्रमण कारवाईमध्ये 17 हातगाडी, 21 टपरी, 1 टेम्पो, 45 फ्लेक्स बॅनर , 302 किऑक्स, 27 जाहिरात बोर्ड, 31 दुकानासमोरील शेड पूर्णपणे निष्कासित करण्यात आले. कुणाल आयकॉन रोड, जगताप डेअरी चौक, वाकड चौक व वाकड ब्रिज खाली असलेल्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच, पिंपळेसौदागर कुंजीर चौक येथे 7 मी. X5 मी. चे दोन व 10 मी.x12 मी चे दोन असे 4 पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. तीन चाकी 1 टेम्पो, 1 हातगाडी , 2 फ्लेक्स यावर कारवाई करण्यात आली.

Kalewadi : रिक्षा चोरी करणा-या सराईताला अटक, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

कृष्णानगर पोलीस लाईन परिसर, साने चौक परिसरात रोड, फुटपाथवर (Pimpri) अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली. यामध्ये 7 मोठया टप-या , 2 बॅनर, 41 लहान टप-या, 33 अनधिकृत ओटे, 13 हातगाडी, 5 लहान शेड, 600 चौ.फुटाचे 3 शेड तसेच सानेचौक परिसरात 2500 चौ,फुटाच्या पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. जाधववाडी, कुदळवाडी आणि बो-हाडेवाडी परिसरात 18 जाहिरात फलक, 2 हातगाड़ी, 3 टपरीवर कारवाई करण्यात आली.

 

मोशी टोल नाका ते भारतमाता चौक परिसर डुडुळगाव परिसर आणि चरोली गाव परिसरात 9 हातगाड्या, 1 टपरी , 127 कीऑक्स 28 बॅनर हटविण्यात आले. वल्लभनगर परिसरात 11 टपऱ्या, 3 हातगाडी, 4 फ्लेक्स आणि 29 कीऑक्सवर कारवाई करण्यात आली.

काळेवाडी येथे 800 चौरस मीटर अनाधिकृत पत्रशेड निष्कासित करण्यात आले. तर, 1 हातगाडी, 2 टपरी, 1 फ्लेक्स, 8 कीऑक्सवर कारवाई करण्यात आली.

Nigdi : निगडीत 1 मे पासून आमदार चषक स्पर्धा

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व क्षेत्रीय अधिकारी, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, यांचे नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण निरिक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीट निरीक्षक), मजूर व इतर महापालिका कर्मचारी व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तसेच पोलिस कर्मचारी व महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांचे जवान यांच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली. जेसीबी, ट्रक/डंपर, पिंजरा वाहने, क्रेन यांचा वापर कारवाईत करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.