Pimpri : खासगी मॉल्स, मल्टिफ्लेक्स, हॉस्पिटलमधील अनाधिकृत पार्किंग बंद करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – खासगी जागेवरील मल्टिफ्लेक्स, मॉल्स, हॉस्पिटलमधील अनाधिकृत पार्किंग बंद करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना दिला आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, पुणे शहर आणि इतर परिसरामध्ये नवीन धोरणांनुसार मल्टिप्लेक्स, मॉल्स, हॉस्पिटल याठिकाणी पार्किंग शुल्क आकारण्यात येणार नाही, असा ठराव 14 जूनला पुणे महानगरपालिकेत शहर सुधारण्याच्या बैठकीत मंजूर करुन घेण्यात आला. त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवडमधील मॉल्स, मल्टिप्लेक्स व हॉस्पिटलमधील पार्किंग तातडीने बंद करण्यात यावी.

  • शहरामधील मॉल्स, मल्टिप्लेक्स व हॉस्पीटलमधील पार्किंगची लुटमार थांबवा अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने शहरामध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.निवेदन देताना शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष गणेश जाधव, विद्यासागर गायकवाड, कैलास कुदळे, अॅड. दत्ताराम साळवी, देवेन यादव, गोरकनाथ कवडे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.