BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : धोकादायक डिपी त्वरीत दुरुस्त करण्याची मातोश्री ग्रुपची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरीतील धोकादायक डिपी (विद्युत रोहित्र) त्वरीत दुरुस्ती करावी, अशी मागणी पिंपरीतील मातोश्री ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर यांनी महावितरणकडे लेखी निवेदनांद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी कॅम्प कपडा मार्केट रिव्हर रोड भाजीमंडई सर्वञ पिंपरी कॅम्प परिसरात गेल्या अनेक वर्षापासून चोरीच्या लाईटचा प्रकार बिनधास्तपणे केला जातो. या परिसरात सर्वच डिपी उघड्यावर दिसून येतात महावितरण अधिकारी माञ, पूर्णपणे दुर्लक्ष करतांना दिसत आहे.

  • चोरीच्या लाईन टाकणा-या आणि हप्तेखोरी करणा-या अधिका-यांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी. पिंपरी कॅम्प परिसरातील सर्व डिपी ट्रान्सफार्म झाकणे बसवून कायमस्वरुपी बंद ठेवण्यात यावी.

उघड्या ट्रान्सफाॉर्म आणि डिपीमुळे पावसाळ्यात मोठया दुर्घटना घडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वा़ढत आहे. महावितरण अधिका-यांनी या विषयाकडे गांभीर्याने घ्यावा. पावसाळ्याचे दिवस असल्याने ही अतिशय गांभीर्यपूर्वक बाब आहे. त्वरीत कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

HB_POST_END_FTR-A2

.