Pimpri : विद्यार्थ्याची आर्थिक पिळवणुक थांबविण्याची युवक कॉंग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज – राज्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्याना परिक्षा शुल्क माफ केले आहे . असे असताना देखील राज्य सरकारच्या निर्णयाला न जुमानता महाविदयालयाकडून अन्यायकारक रित्या विद्यार्थ्यांकडून परिक्षा शुल्क वसूल केले जात आहे.या मुळे विद्यार्थ्यांची अर्थिक पिळवणूक होत आहे . विद्यार्थ्यांची अर्थिक पिळवणूक थांबवावी या मागणीचे निवेदन कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांना युवक कॉंग्रेसच्यावतीने देण्यात आले.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, विद्यार्थ्यांची अर्थिक पिळवणूक होत आहे. ती त्वरित थांबविण्याबाबत आणि घेतलेले शुल्क परत करणेबाबत तसेच सिंहगड महाविदयालयातील अभियांत्रिकीच्या सिध्देश पिसाळ आणि मयुरेश कुलकर्णी या दोन विद्यार्थ्यांचे गेले ७ दिवस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संविधानच्या प्रस्ताविकेच्या शिळे जवळ नियमानुसार लागू असलेले एन.सी.सी आणि क्रीडाचे गुण मिळणेबाबत उपोषण सुरु आहे. या उपोषणकर्त्यांनां युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट देऊन चौकशी केली. वरील दोन्ही बाबीत त्वरित वैयक्तिक लक्ष घालून संबंधितांना न्याय देण्यात यावा, अन्यंथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. याबाबत युवक काँग्रेसने कुलगुरुना निवेदन दिले.

वरील दोन्ही बाबीत त्वरित वैयक्तिक लक्ष घालून संबंधितांना न्याय देण्यात यावा , अन्यंथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. याबाबत युवक काँग्रेसने कुलगुरुना निवेदन दिले. शिष्टमंडळात युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे , शहर सरचिटणीस करण गील , पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव , चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे , रवी म्हेत्रे आदी सहभागी झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.