Pimpri: भाजपमधील डोळे आणि कान योग्य ते टिपतात; मंत्रीपदाबाबबत पालकमंत्र्यांचे भाष्य

एमपीसी न्यूज – आम्ही सगळे संघटनेत काम करतो. संघटनेला 10 हजार डोळे आणि 20 हजार कान असतात. हे कान आणि डोळे योग्य वेळेला योग्य ते टिपतात. पिंपरी-चिंचवडला मंत्रीपद देण्याबाबत संघटनेने अजून निष्कर्ष काढला नसेल. संघटना त्या निष्कार्षापर्यंत आली नसेल. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराला मंत्रीपद मिळाले नसल्याचे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच पुणे ग्रामीणला वर्षानुवर्ष मंत्रीपद मिळाले नव्हते. यावेळी मावळला मंत्रीपद देऊन तो अनुषेश भरुन काढल्याचेही ते म्हणाले.

नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात मावळचे आमदार बाळा भेगडे यांची वर्णी लागली. परंतु, पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांना मंत्रीपदाने पुन्हा हुलकाविणी दिली.

  • पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानिमित्त प्रथमच शहरात आलेले चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, ”आम्ही सगळे प्रामाणिकपणे संघटनेत काम करतो. संघटनेला 10 हजार डोळे आणि 20 हजार कान असतात. हे कान आणि डोळे योग्य ते टिपतात. योग्य वेळी योग्य त्या माणसाला योग्य ते पद दिले जाते”.

पिंपरी-चिंचवड शहराबाबत संघटनेने अद्यापही निष्कर्ष काढला नसेल. संघटनेने योग्य वेळ टिपली नसले. त्यामुळे संघटना त्या शहराला योग्य ते पद देण्याच्या निष्कार्षापर्यंत आली नसेल. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराला मंत्रीपद मिळाले नसल्याचे, पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.