Pimpri : यशस्वी विद्यार्थ्यांचा अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज – प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती आणि पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय यांचे संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 16) पिंपरी आयुक्तालय येथे 10 वी तसेच 12 वीमध्ये यशस्वीरित्या पास होऊन यश संपादन केलेल्या पोलीस मित्र स्वयंसेवकांच्या अक्षय विजय मुनोत, संजीवनी गोपाळ बिरारी, शुभम जयेंद्र मकवाना, हितेश एकनाथ सरोदे, अनिकेत जयप्रकाश शिंदे या यशस्वी मुलांचा सन्मान शहर अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे विजय पाटील, अर्चना दाभोळकर, विजय मुनोत, संतोष चव्हाण, बाबासाहेब घाळी, गोपाळ बिरारी, मनोज ढाके, देवयानी पाटील, गौरी सरोदे, विभावरी इंगळे आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II
  • यावेळी अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे म्हणाले,”पोलीस मित्र स्वयंसेवक गेल्या अनेक वर्षांपासून शहर व ग्रामीण पोलिसांना सुरक्षा,बंदोबस्तकरिता मदत करीत आहेत. त्यांच्या मुलांनी शालेय तसेच माध्यमिक परीक्षेमध्ये जे यश मिळवले आहे, ते उल्लेखनीय आहे. पोलीस कुटुंबियांना याचा सार्थ अभिमान वाटतो, भविष्यातही त्यांना यश प्राप्त व्हावे.”

प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” स्वयंसेवक,पोलीस मित्र हे पोलिस आणि नागरिक यांच्यामधील महत्वाचा दुवा म्हणून समितीच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरात अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. स्वयंसेवकांच्या या तरुण पिढीने विद्यार्थीदशेत उत्तीर्ण होऊन चांगले यश संपादन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.