Pimpri : शॉर्ट सर्किटमुळे काच विक्री दुकानाला आग; चौघांना वाचवण्यात ‘अग्निशमन’ला यश

एमपीसी न्यूज – शॉर्टसर्किट झाल्याने काचेच्या दुकानाला आग लागली. दुकानात चार कामगार अडकले. अग्निशमन विभागाने त्यांना सुखरूप बाहेर काढले. ही घटना शनिवारी (दि. 6) रात्री साडेअकराच्या सुमारास मोरवाडी येथे घडली.

इरफान शेख (वय 45), अखिल मुजावर (वय 45), आसिफ (वय 35), शान बाज (वय 35) अशी वाचवण्यात आलेल्या कामगारांची नावे आहेत.

  • मोरवाडी मस्जिदच्या मागे मोहम्मदिया आर्ट ग्लास या दुकानाला (इलेक्ट्रिक) शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची माहिती इरफान शेख यांनी अग्निशमन विभागाला दिली. त्यानुसार संत तुकाराम नगर विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. दुकानामध्ये चार कामगार अडकले होते.

दुकानापर्यंत जाण्यासाठी अग्निशमन विभागाला अडचणी आल्या.  शॉर्टसर्किट झाले असल्याने कामगारांना बाहेर पडता येत नव्हते. परिसराचा वीजपुरवठा बंद करून चार जणांना बाहेर काढण्यात आले.

  • अग्निशामक अधिकारी अशोक कानडे, फायरमन हनुमंत होले, निखिल गोगवले, अमोल चिपळूणकर, संभाजी दराडे, वाहन चालक विशाल बाणेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.