Pimpri : अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा पहिला पुरस्कार सहारा वृद्धाश्रमास प्रदान

एमपीसी न्यूज – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती, पिंपरी (Pimpri) -चिंचवड महापालिकेचा पहिला कार्यगुण गौरव पुरस्कार मावळ तालुक्यातील सहारा वृद्धाश्रम या संस्थेस काल (बुधवारी) प्रदान करण्यात आला.
Maharashtra : क्षमता नसणारे लोक ‘क’ पदार्थ बुद्धिमत्ता असणारे – सुषमा अंधारे
पिंपरी (Pimpri) येथील मोरवाडी चौकातील अहिल्यादेवी पुतळ्याजवळ हा पुरस्कार सोहळा पार पडला. रस्त्यावर सापडलेल्या अनाथ-निराधार आजी आजोबांचा विनामूल्य सांभाळ करणाऱ्या कुसवली (मावळ) येथील सहारा वृध्दाश्रम या संस्थेच्या प्रा. तृप्ती विजय जगताप व कमल काशिनाथ जगताप यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
अकरा हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल-श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, महापालिका अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहायक आयुक्त रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जयंती महोत्सव समितीचे मुख्य समन्वयक राजाभाऊ दुर्गे आदी यावेळी उपस्थित होते.
“जनतेसाठी आपले आयुष्य वेचणा-या अहिल्यादेवींच्या नावाने पुरस्कार सुरू झाला हि अत्यंत प्रेरणादायी बाब” असल्याचे प गिरीश प्रभुणे यांनी यावेळी म्हटले. तर “सामाजिक कार्याला पाठबळ देणाऱ्या अहिल्यादेवींच्या नावाच्या या पुरस्कार परंपरेला महापालिकेच्या वतीने सदैव पाठबळ देण्यात येईल” असे आयुक्त शेखर सिंह यांनी आपल्या भाषणात म्हटले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाभाऊ दुर्गे यांनी केले तर विजय बोत्रे-पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी आभार मानले.