Pimpri : पिंपरी-चिंचवडमध्ये पहिला ‘डेफ फिल्म फेस्टिवल 2020’ उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – आचार्य अत्रे रंगमंदिरात शॅार्ट डेफ फिल्म फेस्टीवल अतिशय उत्साहात पार पडला. पिंपरी- चिंचवड परिसरातील मूकबधिर असलेल्या पाच युवकांनी सध्याच्या वस्तूस्थितीवर आधारित लघुपट तयार करुन पिंपरी-चिंचवडमध्ये पहिला डेफ फिल्म फेस्टिवल आयोजित केला होता. या कार्यक्रमाची सुरूवात प्रमुख पाहुणे राजेश कुलकर्णी, चेतन जोशी, परशुराम बसवा, विलास मोरे, श्री व सै्ा. शोभा एकनाथ फटांगडे यांनी दिपप्रज्वलित करून शोभा यांनी फित कापून या कार्यक्रमास सुरूवात झाली.

या फेस्टिवलमध्ये दाखविण्यात आलेले लघुचित्रपट -फादर सन प्रॉब्लेम केअर फन्नी, फार्मर ,व्हाय अवॉर्ड?, होर्रेर, चॅट? ब्रेन क्रेज, अँग्री वर्सेस हॅप्पी या लघुचित्रपटांची निर्मिती आणि सादरीकरण अरुण गायकवाड, गजानन जगताप, सुदर्शन फटांगडे,राहुल मरसुते आणि किशोर साळुंखे या ५ मूकबधिर मुलांनी एकत्र येऊन उल्लेखनीय असे लघुचित्रपट निर्माण करून फेस्टिव्हल आयोजित केला होता.

विषम परिस्थितीत समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. यामध्ये सुदर्शन फटांगडे याची निर्मिती आणि संकलन असलेल्या शाॅर्टफिल्म या महोत्सवात प्रदर्शित करण्यात आल्या.रंगमंचावर उत्स्फूर्तपणे आणि लीलया वावर खरोखरच अभिमानास्पद आहे. त्याचा लहान भाऊ पियुष व आईबाबा शोभा व एकनाथ फटांगडे यांचा त्याला असलेला उत्स्फूर्त पाठिंबा म्हणजे ‘तू भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ अशा स्वामींच्या उक्तीप्रमाणे भासली. फादर सन प्राॅब्लेम केअर फन्नी, व्हाय अवॅार्ड? आणि अँग्री वर्सेस हॅप्पी या त्याच्या विशेष बनविलेल्या शाॅर्टफिल्म आहेत.

मूकबधिर असून सुद्धा परिसरातील मूकबधिर आणि सामान्य लोकांसमोर हे लघुपट सादर करून एक आदर्श निर्माण केला आहे.तेथील सहभागी मुलांचा उत्साह, आनंद,निर्मितीक्षमता आणि निरागसता अक्षरशः वाखाणण्यासारखी होती.शब्दाविन संवाद म्हणजे काय याची प्रचीती देणारे क्षण सर्वांनी अनुभवले. तेथील आलेली मुले एकमेकांशी सांकेतिक भाषेत जो संवाद साधत होती ती सकारात्मक ऊर्जा पाहून विश्वासच बसत नाही की यांच्यात काही न्युन आहे. आपल्या मनातील न्यूनगंडाला नतमस्तक करायला लावणारे चैतन्य तेथे दिसत होते.

यावेळी पुणे, मुंबई येथून विविध क्षेत्रात कार्य करणारे मुकबधिर सहकारी व अनेक पालक पण उपस्थित होते. त्यामध्ये मुकबधिर संस्थाचे प्रमुख श्री राजेश कुलकर्णी (मुंबई) , चेतन जोशी (पुणे), परशुराम बसवा(पिंपरी-चिंचवड), विलास मोरे(पिंपरी-चिंचवड), बबलुसाहेब,भूगोल फाऊंडेशन अध्यक्ष विठ्ठल (नाना) वाळुंज, डा्ॅ. राजेशकुमार राऊत (ह्रदयरोगतज्ञ) लायन्स क्लब आकुर्डी सफायर व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी या युवकांचे कौतुक आणि त्यांना उमेद देण्यासाठी भूगोल फाउंडेशन चे अध्यक्ष श्री. विठ्ठल (नाना) वाळुंज पाटील यांनी पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी आयोजकांचा विविध देशी वृक्षांची रोपे, शाल,श्रीफळ देऊन सत्कार करून केलेल्या कामाचे कै्ातुक केले. तसेच सर्वांना आवाहन केले की, या शाॅर्टफिल्म आपण अगदी आवर्जुन पहाव्यात व त्यांचे कै्ातुक समाजामध्ये व्हावे जेणेकरून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल.

यावेळी संतनगर मित्र मंडळ व भूगोल फाउंडेशन चे सहकारी साहेबराव गावडे, सतीश देशपांडे, कु.अपूर्वा वाळुंज, एकनाथ फटांगडे , कु. पियुष फटांगडे सुद्धा हजर होते.यावेळी संतनगर मित्र मंडळाच्या सै्ा.शोभा फटांगडे यांनी सर्व मुलांचे विशेष कै्ातुक केले की मोबाईल व ल‌ॅपटाॅप शिवाय इतर काहीही साधनांचा वापर न करता या फिल्म त्यांनी बनविल्या आहेत. त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार मानले. तसेच परिसरातील या कार्यक्रमासाठी मूकबधिर व सामान्य नागरिक,मुले व महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता.

यावेळी भूगोल फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल(नाना) वाळुंज-पाटील म्हणाले, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, निसर्गाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आवाहन करतो की आपण सर्वांनी पुढे येऊन अशा मुलांना सहकार्याचा हात दिला पाहिजे जेणेकरून ते नवीन उमेदीने पुढे येऊन समाजापुढे नवीन आदर्श निर्माण करतील व नवीन भारत निर्माणाच्या कामात हातभार लावतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.