Pimpri : भोसरीत महाशिवरात्री निमित्त भव्य कीर्तन महोत्सव

एमपीसी न्यूज – महेशदादा स्पोट्‌र्स फाऊंडेशन यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री निमित्त 26 फेब्रुवारी ते 5 पार्च दरम्यान भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे देखील कीर्तन होणार आहे, याबाबतची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.

भोसरी, लांडगे आळीतील महेशदादा स्पोट्‌र्स फाऊंडेशन क्रीडांगण येथे हा आठदिवसीय कीर्तन महोत्सव होणार आहे. दररोज रात्री 7 ते 9 यावेळेत कीर्तन होणार आहे. मंगळवारी (दि.26) डॉ. विकासानंद महाराज मिसाळ यांचे कीर्तन होणार आहे.

  • बुधवारी (दि.27) संदिपान महाराज शिंदे-हसेंगावकर, गुरुवारी (दि.28) समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख-इंदुरीकर, शुक्रवारी (दि.1) अॅड. जयवंत महाराज बोधले, शनिवार (दि.2) गहीनीनाथ महाराज औसेकर, रविवार (दि.3) प्रमोद महाराज जगताप, सोमवार (दि.4) संजय महाराज धोंडगे आणि मंगळवारी (दि.5) पांडुरंग महाराज घुले यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्याने महोत्सवाची सांगता होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील भाविक-भक्तांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या संयोजनात महेशदादा स्पोट्‌र्स फाऊंडेशन, पठारे-लांडगे तालीम मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, वैष्णव विचार कीर्तन महोत्सव समिती, भोजेश्वर मित्र मंडळ, माळी-आळी मित्र मंडळ, नामस्मरण भजनी मंडळ, जय हनुमान मित्र मंडळ, आझाद मित्र मंडळ, श्री संत सावता माळी महाराज प्रतिष्ठाण यांनी पुढाकार घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.