Pimpri : कोणत्याही समाजाची उंची जातीवर ठरत नसते – ॲड. रानवडे

एमपीसी न्यूज – मातंग समाजाला अध्यक्रांतीकारक व क्रांतीगुरू लहुजी वस्ताद ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्यापर्यंत थोर व मोठी स्वाभिमानी परंपरा आहे. कोणत्याही समाजाची उंची जातीवर ठरत नसून त्या समाजात जन्माला येऊन समाजासाठी मोठी कामगिरी करणाऱ्या लोकांमुळे मान व सन्मान मिळतो व त्या सन्मानास स्वाभिमानी मातंग समाज पात्र आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड. लक्ष्मण रानवडे यांनी केले.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या शताब्दी जयंती महोत्सवानिमित्त  संत तुकारामनगर येथील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे संस्था व लहुजी शक्तीसेना यांच्या वतीने साजरी करण्यात आली. चेहऱ्यावर मास्क लावून व सामाजिक अंतराचे पालन करत मर्यादित लोकांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड. लक्ष्मण रानवडे होते. तर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचे प्रतिमेचे पूजन युवा नेते विरेन्द्र बहल यांच्या हस्ते करण्यात आले.

ॲड. लक्ष्मण रानवडे पुढे बोलताना म्हणाले, स्त्रीचा सन्मान कसा उंच व तिचे महत्त्व मानव जगतात कसे आहे, हे त्यांच्या लेखनातून अधोरेखीत झालेले आहे. अण्णाभाऊंनी परिवर्तनवादाची नांदी आपल्या शाहिरी व लेखनातून केली. आपल्या शाहिरीतून इंग्रजाविरुद्ध लढा देवून जागृती निर्माण केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्सव समितीचे अध्यक्ष सुधीर कांबळे यांनी केले. तर संयोजन कार्याध्यक्ष गणेश वैरागर, माजी अध्यक्ष गुलाबराव शेंडगे, सदस्य अमोद वायदंडे, सदस्य वैभव वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाचे अभार संघटनेचे सचिव राजू आवळे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.