Pimpri : पादचाऱ्याचा आयफोन मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्याचा मोपेड दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मोबाईल फोन हिसकावला. ही घटना मोरवाडी बसस्टॉपजवळ शुक्रवारी (दि. 10) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

अमित रामकृष्ण रस्तोगी (वय 37, रा मोरवाडी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अमित मोरवाडी येथील बसस्टॉपजवळ थांबले होते. त्यावेळी मोपेड दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या हातातील तीस हजार रुपये किमतीचा आयफोन मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.