Pimpri : न्यायमूर्ती लोया यांचा संशयित मृत्यू प्रकरण न्यायालयीन मार्गाने तडीस नेऊ -बी.जी. कोळसे-पाटील

'अपना वतनचा' अन्नत्याग सत्याग्रह तात्पुरता स्थगित

एमपीसी न्यूज – विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती लोया यांच्या संशयित मृत्यूची फेरचौकशी करावी, या मागणीसाठी ‘अपना वतन’ या संघटनेद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्रव्यवहार करण्यात आला होता . त्यास राज्य सरकारने प्रतिसाद न दिल्याने अपना वतन संघटनेच्या वतीने शनिवार (दि.7) मार्च पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ,पिंपरी याठिकाणी अन्नत्याग सत्याग्रह सुरु करण्यात आले होता. या आंदोलनास शहरातील 50 राजकीय व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला होता.यावेळी न्यायमूर्ती लोया यांचे मृत्यू प्रकरण न्यायालयीन मार्गाने तडीस नेऊ, असे अश्वासन मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायधीश बी.जी. कोळसे-पाटील यांनी दिले.

मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. याप्रसंगी बोलताना त्यांनी केंद्रामध्ये असलेल्या भाजपा सरकारवर हल्ला केला. देशामध्ये सर्व लोकशाही व्यवस्थांवर सत्ताधरी पक्षकाडून अप्रत्यक्षपणे हल्ले केले जात असून लोकशाही उध्वस्त करण्याचा घाट घातला जात आहे. मूलभूत प्रश्नांवरून लक्ष विचलित करून देशामध्ये अस्थिरता निर्माण करणायचा प्रयत्न सध्याचे केंद्र सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळेस त्यांनी आंदोलनकर्त्याना न्यायमूर्ती लोया प्रकरणात स्वतः लक्ष घालून न्यायालयीन मार्गाने न्या. लोया प्रकरण तडीस नेऊ, असे अश्वासन दिले.

कोळसे पाटल यांनी आंदोलन थांबवण्याची आंदोलनकर्त्याना विनंती केल्यानंतर अपना वतनचे “अन्नत्याग सत्याग्रह” तात्पुरता स्थगित करण्यात आला. यावेळेस न्या. बी.जी कोळसे पाटील यांच्या हस्ते संघटनेचे सिद्दीक शेख व हमीद शेख यांना लिंबू सरबत पाजून आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानवजी कांबळे , मारुती भापकर, राहुल डंबाळे, ऍड मोहन अडसूळ, ऍड किरण शिंदे, ऍड सिकंदर शेख, राजश्री शिरवळकर, संगीत शहा, अनिता नायडू , प्रकाश पठारे , विशाल जाधव ,सुरेश गायकवाड ,सालार शेख , शहाबुद्दीन शेख ,रौफ शेख , रशीद सय्यद, दीपक खैरनार, फारुख शेख ,शिवशंकर उबाळे , तौफिक पठाण , मनोज मोरे , जावेद सौदागर , दिलीप रणपिसे ,जमीर तांबोळी , संदीप साळवे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.