Pimpri: लायन्स क्लबने महापालिकेला दिले दोन हजार ‘एन 19’ मास्क

The Lions Club donated 2,000 'N19' masks to the corporation

एमपीसी न्यूज – द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लबच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेला दोन हजार “एन 19” मास्क भेट देण्यात आले. बिजलीनगर येथे आज (गुरुवारी) झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी मास्क स्वीकारले.

महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ओमप्रकाश पेठे,  सनेर पाटील, श्रद्धा पेठे, सुनील जाधव, हिरामण गवई, प्रदीप कुलकर्णी, राजेंद्र कोळी, विजय अग्रवाल, शैलेश आपटे, श्री. सावंत, विक्रम माने, अनिल दंडादे, उपेंद्र खांबेटे, रवी सातपुते यांच्यासह क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.

क्लबच्या वतीने महापालिका रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांसाठी दोन हजार मास्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उपक्रमाबद्दल अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी लायन्स क्लबच्या पदाधिका-यांचे कौतुक केले.

सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले की, गेल्या दोन अडीच महिन्यांपासून शहरातील कोरोना परिस्थिती रोखण्यासाठी महापालिकास्तरावर अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत.

कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी शहरातील लायन्स क्लब सारख्या सामाजिक संस्था पुढाकार घेत असून त्यांचे कार्य अभिमानस्पद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.