Pimpri: पोलीस चौकीत आलेला व्यक्ती निघाला कोरोना पॉझिटीव्ह; पाच पोलीस क्वारंटाईन

एमपीसी न्यूज – भांडणाच्या प्रकरणात तक्रार देण्यासाठी शहरातील एका पोलीस चौकीत आणलेल्या एकाला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या पाच पोलीस कर्मचार्‍यांवर क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे.

19 मे रोजी दोन भावंडाचा घरगुती वाद पोलीस चौकीपर्यंत पोहोचला. पोलीसांनी एकाची अदखलपात्र तक्रार घेतली. तर, दुसर्‍याला नोटीस बजावत समजूत काढून घरी पाठवून देण्यात आले.

यापैकी एकाला दुसर्‍या दिवशी सर्दी आणि खोकला झाल्याने तो औंध येथील जिल्हा रुग्णालयात गेला. तपासणीत 21 मे रोजी त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या पाच पोलीस कर्मचार्‍यांवर क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.