Pimpri : कपड्यांच्या शोरूममधील मॅनेजरने केला सव्वा सात लाखांचा अपहार

एमपीसी न्यूज – कपड्यांच्या शोरूममध्ये मॅनेजर म्हणून काम करत असताना एकाने शो रूममधील रोख रकमेसह जर्किन्स, जीन्स पॅन्ट, टी-शर्ट अशा कपड्यांचा एकूण सात लाख 38 हजार 766 रुपयांचा अपहार केला ही घटना फेब्रुवारी 2019 ते एप्रिल 2019 या कालावधीत पिंपरीमधील सिटी मॉल येथे घडली.

दत्तात्रय अशोक अजमेर (वय 36, रा वाढेबोहाई, ता. हवेली) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दानिश खान (वय 26 रा पाषाण. मूळ रा. भोपाळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय यांचे पिंपरीमधील सिटी मॉल येथे लि हे कपड्यांचे शोरूम आहे. या शो रूममध्ये दानिश मॅनेजर म्हणून काम करत होता.

दानिशने फेब्रुवारी 2019 ते एप्रिल 2019 या कालावधीत शो रूममधील एक लाख 99 हजार 359 रुपये रोख रक्कम व वेगवेगळ्या कंपनीचे जर्किन्स जीन्स पॅन्ट टी-शर्ट असा एकूण 7 लाख 38 हजार 776 रुपयांचा अपहार केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.