Pimpri: महापौर आरक्षण; अनुसूचित जाती प्रवर्गातील नगरसेवक हिरमुसले!

एमपीसी न्यूज – महापौर आरक्षण लागू झाल्यापासून म्हणजेच सन 2001 पासून आजपर्यंत अनुसुचित जाती (एससी)चे आरक्षण एकदाही पडले नव्हते. यावेळी ‘एससी’चे आरक्षण पडेल अशी या अनुसूचित जाती प्रवर्गातील नगरसेवकांना अपेक्षा होती. परंतु, शहराचे महापौरपद पुढील अडीच वर्षाकरिता सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील नगरसेवक हिरमुसले आहेत.

महापौर आरक्षण लागू झाल्यापासून म्हणजेच सन 2001 पासून आजपर्यंत सगळ्या प्रवर्गातील नगरसेवकांना पिंपरी – चिंचवडच्या महापौरपदी संधी मिळाली होती. त्यामध्ये खुला प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), अनुसुचित जमाती (एसटी) या प्रवर्गाच्या नगरसेवकांना संधी मिळाली आहे.

त्यात प्रकाश रेवाळे (इतर मागास प्रवर्ग) , मंगला कदम (महिला खुला प्रवर्ग), डॉ, वैशाली घोडेकर (नागरीकांचा मागास प्रवर्ग), अपर्णा डोके (नागरीकांचा मागास प्रवर्ग), योगेश बहल (खुला प्रवर्ग), मोहिनी लांडे (महिला खुला प्रवर्ग), शकुंतला धराडे (अनुसूचित जमाती), नितीन काळजे (नागरीकांचा मागास प्रवर्ग), राहुल जाधव (नागरीकांचा मागास प्रवर्ग) यांचा समावेश आहे.

पिंपरी महापालिकेचे केवळ अनुसुचित जाती (एससी)चे आरक्षण राहिले होते. त्यामुळे ‘एससी’चे आरक्षण पडेल, अशी या अनुसुचित जाती प्रवर्गातील नगरसेवकांना अपेक्षा होती. परंतु, आरक्षण पडले नाही. त्यामुळे नगरसेवकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.