BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: भांडण मिटवणे पडले महागात; मोटारीची तोडफोड करत केली जबर मारहाण

1,149
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- भांडण मिटविण्यासाठी बोलवून एकाला जबर मारहाण करत मोटारीची तोडफोड केली. शनिवारी (दि.२३) सायंकाळी साडे चारच्या सुमारास पिंपरीतील विठ्ठलनगर परिसरात ही घटना घडली असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी बाबासाहेब काळुराम जाधव (वय २७, रा. बालाजीनगर, भोसरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार आकाश बळीराम खळगे (वय २५, रा. बालाजीनगर, भोसरी) आणि अमोल गोपीनाथ पंडीत (वय ३०, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, शनिवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास विठ्ठलनगर येथे दोन मित्रांची भांडणे सुरू होती. भांडणात मध्यस्थी करण्यासाठी त्या दोघांनीही फिर्यादी जाधव यांना बोलविले. मात्र, जाधव हे दुसऱ्या मित्राची बाजू घेत असल्याचा समज आरोपी खळगे याचा झाला.

यामुळे खळगे आणि त्याचा नातेवाईक पंडीत या दोघांनीही जाधव यांची मोटार फोडली. तसेच डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले. पोलीस हवालदार झांजरे अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.