Pimpri: महापालिका करणार उद्यानांचे सर्वेक्षण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका शहरातील उद्यानांचे सर्वेक्षण करणार आहे. उद्यानांची देखभाल दुरुस्ती होत आहे का?, उद्याने कार्यक्षमपणे कार्यरत आहेत का? याचे सर्वेक्षण केले जाणार आहे. क्षेत्रीय कार्यालयामार्फेत उद्यानांची तपासणी केली जाणार आहे. याबाबतचा अहवाल 31 मे पर्यंत दक्षता व गुणनियंत्रण विभागास सादर करावा लागणार आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबतचा आदेश दिला आहे.

महापालिकेच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये 178 उद्याने आहेत. त्यापैकी 40 ते 41 उद्यानाची देखभाल महापालिका करते. तर, 100 हून अधिक उद्यानाच्या देखभालीसाठी खासगी संस्थांची नेमणूक केली आहे. अनेक उद्यानांची अवस्था दयनीय झाली आहे. उद्यानातील खेळणी मोडकळीस आली आहेत. त्यापार्श्वभूमीवर महापालिका उद्यांनाचे सर्वेक्षण करणार आहे. 178 उद्यानांची देखभाल दुरुस्ती होत आहे का ?, उद्याने कार्यक्षमपणे कार्यरत आहेत किंवा कसे आहे ? याची प्रभावीपणे पाहणी करण्याचा सूचना आयुक्तांनी दिल्या आहे.

  • उद्यानाच्या तपासणी सूचीनुसार सर्वेक्षण करण्याबाबत दक्षता पथकास सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या उद्यानांचे सर्वेक्षण कामकाजासाठी प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर कार्यकारी अभियंत्याने त्यांच्या नियंत्रणाखालील प्रत्येक प्रभागाकरिता एका कनिष्ठ अभियंत्याची या कामासाठी नेमणूक करावी. त्यांच्याकडून उद्यानांची यादी व तपासणी सूचीनुसार त्यांच्याशी संबंधित कार्यक्षेत्रातील उद्यानांची तपासणी करावी.

कनिष्ठ अभियंत्यामार्फत प्राप्त होणारा अहवाल कार्यकारी अभियंत्याने 31 मे पर्यंत दक्षता व गुणनियंत्रण विभागास सादर करावा. या कामासाठी काही अडचण आल्यास त्यांचे निराकरण करण्यासाठी दक्षता समितीचे कार्यकारी अभियंता मनोज सेठीया, उद्यान अधीक्षक दत्तात्रय गायकवाड यांच्यांशी संपर्क करावा. या कामकाजासाठी त्यांची ‘समन्वयक’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.