Pimpri: महापालिकेचा आरोग्य विभाग मोकाट जनावरे पकडणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील भटकी, मोकाट, जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय विभागाद्वारे जनावरे पकडण्याची मोहिम राबविण्यात येणार आहे. मोकाट जनावरे पकडण्यात येणार आहेत. त्यामुळे मालकांनी जनावरे बंदिस्त करुन ठेवण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट श्वान (कुत्री), भटक्या जनावरांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. गाय, म्हैस, घोडा, गाढव या प्राण्यांच्या रस्त्यांवर वावर वाढला आहे. मुख्यत्वे करुन अंतर्गत रस्ते, जुना पुणे-मुंबई महामार्ग, बाजारपेठा, उद्याने इत्यादी परिसरात ठिकाणी जनावरांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होत आहे.

महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाद्वारे जनावरे पकडण्याची मोहिम राबविण्यात येणार आहे. मोकाट जनावरे पकडण्यात येणार आहेत. त्यामुळे जनावरे मालकांनी आपली जनावरे बंदिस्त करुन ठेवावीत. शहरात सार्वजनिक ठिकाणी त्यांचा वावर होणार नाही. याची दक्षता घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.