BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा ‘राष्ट्रवादी’ला रामराम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. शनिवारी शहरातील पदाधिकारी मुंबईला बैठकीसाठी गेले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा दिला आहे.

याबाबतीत मच्छिंद्र तापकीर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वैयक्तिक कारणांमुळे पक्षाला रामराम केला आहे.मंजुर जरी झाला नाही तरी मी काम करणार नाही. माझी पक्षावर कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. मला पक्षाने विविध पदावर काम करण्याची संधी दिली.

पदाधिकारी नेत्यांचा मी आभारी आहे. माझ्या वैयक्तिक कारणास्तव पक्षाचे क्रियाशील सदस्य म्हणून काम करु शकणार नाही. वर्षभर कोणत्याही पक्षात जाणार नाही.राजीनाम्याची बातमी समजताच मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी ही पक्षात येण्यासंदर्भात विचारणा केली.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला खूप काही दिले आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3