BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : भविष्यातील प्राणवायूची गरज भागविण्यासाठी आज झाडे लावून जोपासण्याची गरज – श्रीलक्ष्मी ए

एमपीसी न्यूज – सुमारे 20-25 वर्षापूर्वी आपल्याकडे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागेल, अशी आपण साधी कल्पनाही केली नव्हती. पण, आज आपण सहजपणे २० रुपये लिटरप्रमाणे पाणी विकत घेऊन पितो. ही वेळ यायचे कारण म्हणजे आपण उपलब्ध पाण्याचे पुनर्भरण व पुनर्वापर करण्यास ऊशीरा सुरवात केली. त्याप्रमाणे आपण झाडे लावली नाहीत तर आज आपल्याला फुकट मिळणारा ऑक्सिजन भविष्यात विकत घ्यावा लागेल व ते कोणालाही परवडणार नाही.  आपल्या एका श्वासाची किंमत एक रुपया धरली तर आपण हिशोबही करु शकणार नाही. कारण दिवसाला आपण २१६०० वेळा श्वास घेतो. यासाठी आपण आजच मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले पाहिजे, असे आवाहन पुणे विभागाच्या उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए यांनी केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या पर्यावरण प्रेमी संस्थांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी सदाशिव रिकामे, विजय सातपूते, मनेश म्हस्के, रवी मनकर आदी उपस्थित होते.

  • पुढे त्या म्हणाल्या, ही झाडे लावताना भौगोलिक क्षेत्र व वातावरणाचा अभ्यास करुन मुळ जैवविविधतेला पुरक अशीच स्थानिक प्रजातींची झाडे लावली तर ती व्यवस्थित वाढतील. त्यामुळे पर्यावरणातील इतर घटक म्हणजे लहान मोठे प्राणी, पक्षी, किटकसुध्दा आबाधित राहतील व आपल्याला प्राणवायू मिळेल. आपल्या सारख्या संस्था आज शासनाबरोबर काम करीत आहेत. सावरकर मंडळाच्या अशा उपक्रमामुळे आणखी वेगाने पर्यावरण संवर्धनासाठी काम होईल. याबाबत माझी खात्री झालेली आहे. आज ज्या संस्थांचा मंडळाच्या वतीने गौरव होतोय. त्या सर्वांचे महाराष्ट्र शासनाच्या वतीने अभिनंदन करते.

यावेळी ओम निसर्ग मित्र, वृक्षवल्ली परिवार, भावसार व्हिजन, निसर्ग राजा मित्र जिवांचे, साई कॉम्प्युटर, पवनामाई जलअभियान, इंडो एथेलेटिक्स सोसायटी, इटन ग्रुप आदी अठ्ठावीस संस्थांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. मेळावा यशस्वी होण्यासाठी दिपक पंडित, शैलेश भिडे, नीता जाधव, आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

  • धनंजय शेडबाळे यांनी प्रास्ताविक केले तर श्रीकांत मापारी यांनी संस्थांचा परिचय करून दिला. भास्कर रिकामे यांनी सूत्रसंचालन केले. या निमित्ताने निसर्ग मित्र विभागाच्या वाटचालीविषयीचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. सुजीत गोरे, हेमंत थोरात व संतोष आमले यांनी प्रदर्शनाचे नियोजन केले. राष्ट्रगीतनंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3