Pimpri: कोरोना हॉटस्पॉट ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सक्रिय रुग्णांची संख्या 300 पार, आपल्या भागात किती अ‍ॅक्टिव्ह रुग्ण?

Pimpri: The number of active patients in Corona Hotspot 'A' field office boundary exceeds 300, how many active patients in your area? 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील 2935 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 1813 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक 305 रुग्ण आहेत. हा प्रभाग कोरोना हॉटस्पॉट झाला आहे. तर, सर्वात कमी म्हणजेच 59 रुग्ण ‘ब’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत आहेत.

महापालिकेने सोमवारी रात्री दिलेल्या नकाशानुसार ही आकडेवारी आहे. आज आतापर्यंत 28 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, शहरातील आजपर्यंत रुग्ण संख्या 2935 झाली आहे.

10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील 2935 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 1813 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1075 सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तर, 47 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. झोपडपट्टी, गावठाण भागात रुग्ण वाढ होताना दिसून येत आहे.

शहरातील रुग्णसंख्या आज तीन हजार पार होईल. आता जुलैअखेरपर्यंत 10 हजार रुग्ण होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.

महापालिकेकडून शहरात कोरोनाचे किती रुग्ण आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती असलेला क्षेत्रीय कार्यालनिहाय नकाशा दररोज प्रसिद्ध केला जातो.

सोमवारी रात्री प्रसिध्द केलेल्या नकाशानुसार संभाजीनगर, मोहननगर, आनंदनगर, चिंचवडस्टेशन, आकुर्डी, प्राधिकरण परिसर येत असलेल्या ‘अ’ प्रभागाच्या हद्दीत सर्वाधिक तर त्याखालोखाल ‘ह’ कार्यालयाच्या हद्दीत रुग्ण आहेत.

क्षेत्रीय कार्यालयानिहाय सक्रिय रुग्ण संख्या!
अ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संभाजीनगर, मोहननगर, आनंदनगर, चिंचवडस्टेशन, आकुर्डी, प्राधिकरण, आनंदनगर, भाटनगर भागात सर्वाधिक 305 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामध्ये आनंदनगर झोपडपट्टीतील सर्वाधिक रुग्णांचा समावेश आहे.

‘ब’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या रावेत, किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड प्रभागात सर्वात कमी म्हणजेच 59 सक्रिय रुग्ण आहेत.

‘क’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा, बोऱ्हाडेवाडी, धावडेवस्ती, इंद्रायणीनगर भागात कोरोनाचे 142 रुग्ण आहेत.

‘ड’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव भागात कोरोनाचे 67 सक्रिय रुग्ण आहेत.

‘इ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी भागात कोरोनाचे 116 रुग्ण आहेत. च-होली, दिघी भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे.

‘फ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या चिखली, कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर, यमुनानगर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22 या प्रभागात कोरोनाचे 96 रुग्ण आहेत.

‘ग’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पिंपरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी भागात कोरोनाचे 110 सक्रिय रुग्ण आहेत.

‘ह’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संत तुकारामनगर, महात्माफुलेनगर, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, नवी सांगवी, सांगवी भागात कोरोनाचे 157 सक्रिय रुग्ण आहेत.

त्यामध्ये दापोडी परिसरात सर्वाधिक रुग्णांची नोंद आहे. तर, आज मंगळवारी साडेअकरा वाजेपर्यंत 28 जणांना लागण झाली आहे. शहरात एकूण 1075 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर महापालिका, खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like