Pimpri: शहरात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली, आज 371 जणांना डिस्चार्ज; नवीन 300 रुग्णांची भर, सात जणांचा मृत्यू

The number of corona-free patients in the city increased, with 371 people discharged today; Addition of 300 new patients, seven deaths : कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी घट्ट होत आहे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 290 आणि शहराबाहेरील 10 अशा 300 जणांना आज (बुधवारी) कोरोनाची लागण झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 371 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. आज एकाचदिवशी सात रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, आजपर्यंतची रुग्णसंख्या 5493 वर पोहोचली आहे.

किवळेतील 40 वर्षीय महिला, काळेवाडीतील 80 वर्षीय पुरुष, घरकुल चिखलीतील 46 वर्षीय पुरुष, दापोडीतील 36 वर्षीय युवक, गांधीनगर, पिंपरीतील 49 वर्षीय महिला, धुळे जिल्ह्यातील 66 वर्षीय पुरुष आणि बावधन खुर्द पुण्यातील 68 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला आहे.

शहरात आत्तापर्यंत 109  जणांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी घट्ट होत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करण्याची मागणी केली जात आहे.

दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे प्रमाण होण्याचे प्रमाण जास्त आहे. सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

आज उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 371 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 3509 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

शहरात आजपर्यंत 5493 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 3509 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 77 जणांचा तर शहराबाहेरील परंतू, महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 32 अशा 109 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 1880 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 990

# पॉझिटीव्ह रुग्ण – 300

#निगेटीव्ह रुग्ण – 815

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 1822

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 2610

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 988

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 5493

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 1880

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 110

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 3509

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 26021

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 82786

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.