Pimpri: कोरोना बळींची संख्या वाढतेय; आज एकाचदिवशी सात जणांचा मृत्यू

The number of corona victims is increasing; Seven people died in a single day today :कोरोना बळींची संख्या वाढतेय; आज एकाचदिवशी सात जणांचा मृत्यू

बळींची संख्या पोहचली 85 वर
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढत आहे. आज, शुक्रवारी  एकाचदिवशी शहरातील सहा आणि शहराबाहेरील एक अशा सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज झालेले मृत्यू आतापर्यंतचे सर्वाधिक आहेत. आजपर्यंत शहरातील 53 आणि शहराबाहेरील पण महापालिका रुग्णालयात 32 अशा 85 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. आजपर्यंत शहरातील 3735  जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

बाधितांमध्ये युवकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. 2209 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, 1473 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरातील कोरोनाचा पहिला बळी 12 एप्रिल रोजी गेला  होता.
थेरगाव भागातील एका पुरुषाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आजपर्यंत शहरातील 53 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

आज आत्तापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील कोरोनाच्या एकूण रुग्ण संख्येच्या तुलनेत मृत्यूचा आकडा अवघा दीड ते पावणेदोन टक्के असला. तरी, मृत्यूमध्ये वाढ होऊ लागली आहे.

मृतांमध्ये वयोवृद्ध आणि कोरोनासह विविध आजार असलेल्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

महापालिकेचे वायसीएम रुग्णालय कोविड रूग्णालय म्हणून घोषित केले आहे. आजपर्यंत शहरातील मृत्यू झालेल्या 53 पैकी 33 जणांचा वायसीएममध्ये मृत्यू झाला आहे. अन्य 20 रुग्णांचा मृत्यू शहरातील खासगी व शहराबाहेरील रुग्णालयांत झाला आहे. तर, शहराबाहेरील 32 जणांचा वायसीएममध्येच मृत्यू झाला आहे.

मृत्यूची कारणे
प्रतिकार शक्ती कमी असलेले, फुफ्फूस, हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, किडनी विकार असे गंभीर आजार असलेल्या रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. शिवाय, काही रुग्ण मृत्यू होण्यापूर्वी अवघे काही तास अगोदर रुग्णालयात दाखल झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.