Pimpri: कोविड सेंटरची संख्या वाढली, आता 11 सेंटर, प्रभाग अधिकाऱ्यांकडे जबाबदारी

The number of covid centers increased, now 11 centers, responsibility to ward officers

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील झपाट्याने वाढणारी रुग्ण संख्या, जूनअखेरपर्यंत तीन हजारापर्यंत जाण्याचा अंदाज आणि पावसाळ्यात अधिक रुग्ण वाढीची शक्यता गृहित धरुन पालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

त्यानुसार कोरोनाग्रस्त रुग्णाच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलेले नागरिक, स्वॅब तपासणीसाठी पाठविलेले नागरिक आणि अलगीकरणासाठी शहराच्या विविध भागातील 11 ठिकाणी ‘कोविड केअर सेंटर’ (सीसीसी) उभारले आहेत. त्यासाठी महाविद्यालयांच्या इमारती, हॉस्टेल ताब्यात घेतली आहेत. कामाचे विकेंद्रीकरण करत या सेंटरची जबाबदारी प्रभाग अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे.

संपूर्ण शहराला कोरोनाने विळखा घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आजपर्यंत शहरातील 1324 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सक्रिय रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी नवीन रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपाचार केले जात आहेत.

सध्या निवडक ठिकाणीच विलगीकरणाची सोय उपलब्ध आहे. जूनअखेरपर्यंत शहरातील रुग्ण संख्या तीन हजारापर्यंत जाईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. तसेच पावसाळ्यात रुग्ण वाढण्याची शक्यताही प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे.

रुग्ण वाढ झाल्यास पावसाळ्यात धावपळ होवू नये, यासाठी प्रशासनाने आत्तापासूनच तयारी सुरु केली आहे. त्यादृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत.

कोविड केअर सेंटर वाढविण्यासाठी प्रशासनाने पालिका इमारतीसह अनेक पर्यायांची तपासणी केली. नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागू नये. तक्रारी येवू नये. त्यासाठी अत्यावश्यक सुविधा असलेल्या शहरातील महाविद्यालयांच्या इमारती, हॉस्टेल ताब्यात घेण्यास पालिकेने प्राधान्य दिले आहे.

त्याठिकाणी स्वतंत्र खाटा, विद्युत व्यवस्था अशी व्यवस्था असते. त्यामुळे पालिका प्रशासनाने त्याला प्राधान्य दिले आहे.

आता शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे रूग्ण आहेत. त्यामुळे त्या-त्या परिसरातील नागरिकांसाठी जवळच कोविड केअर सेंटर असावे, त्यादृष्टीनेही नियोजन केले आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या हायरिस्क कॉन्टॅक्ट, स्वॅब तपासणीसाठी पाठविलेले.

तसेच होम क्वारंटाईन होणे शक्य नसलेलया नागरिकांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले जाते. या नागरिकांचे जेवन, नास्ता, राहणे, अंघोळ या सर्व गोष्टींची व्यवस्था महापालिकेतर्फे करण्यात येते.

सर्व कोविड केअर सेंटरची व्यवस्था लावणे, तेथील कर्मचारी वर्गाचे नियोजन करणे. कामाच्या वेळा ठरवून देणे, बदली कामगार तसेच सेंटरमधील आवश्यक वस्तूंचा पुरवठा या सर्व गोष्टींची जबाबदारी प्रभाग अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर आणि जबाबदारी दिलेले प्रभाग अधिकारी !

# पिंपरी-चिंचवड कॉलेज आफ इंजिनिअरींग, आकुर्डी आणि रिजनल टेलिकॉम सेंटर: शाहुनगर – ‘अ’ प्रभाग अधिकारी चंद्रकांत इंदलकर

# किवळेतील सिम्बॉयोसिस कॉलेज आणि डी. वाय. पाटील मुलींचे हॉस्टेल आकुर्डी : ‘ब’ प्रभाग अधिकारी प्रशांत जोशी

#मोशीतील आदीवासी विभाग मुलांचे व मुलींचे हॉस्टेल आणि डी. वाय. पाटील आयुर्वेदीक कॉलेज, संत तुकारामनगर, पिंपरी : ‘क’ प्रभाग अधिकारी अण्णा बोदडे

#बालाजी युनिव्हर्सिटी, लॉ कॉलेज आणि ताथवडेतील इंदिरा कॉलेज : ‘ड’ प्रभाग अधिकारी सिताराम बहुरे

# बालेवाडी हॉस्टेल : एलबीटी विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील अलमलेकर

# मोशीतील सामाजिक न्याय विभागाचे मुलांचे व मुलींचे वसतिगृह : ‘इ’ प्रभाग अधिकारी बाळासाहेब खांडेकर

# म्हाडा वसाहत, म्हाळूंगे, चाकण : ‘फ’ प्रभाग अधिकारी मनोज लोणकर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.