Pimpri : शहरात रुग्णांची वाढ सुरुच; आज 40 नवीन रुग्णांची नोंद

The number of patients in the city continues; Recorded 40 new patients today

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला रेडझोनमधून वगळल्यापासून शहरातील रुग्ण संख्येतील वाढ सुरुच आहे. मागील तीन दिवसांपासून दिवसाला 40 हून अधिक नवीन रुग्णांची नोंद होत आहे. आज (सोमवारी) दिवसभरात शहरातील 37 आणि शहराबाहेरील तीन अशा 40 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

तर, कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या एकट्या आनंदनगर झोपडपट्टीतील रुग्ण संख्या दीडशेच्या जवळ गेली आहे. आज आनंदनगरसह बौद्धनगरमध्येही नवीन रुग्ण सापडले आहेत.

महापालिकेचे कोरोना संशयितांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे रिपोर्ट सायंकाळी आले आहे. त्यामध्ये 6 पुरुष आणि 9 महिलांचे रिपोर्ट आहेत.

तर, सकाळी काही रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये सर्वाधिक रूग्ण आनंदनगर झोपडपट्टीतील आहेत. आज दिवसभरात नवीन 40 रुग्णांची भर पडली आहे.

आजपर्यंत शहरातील 391 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी 170 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, सात जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 214 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

त्यापैकी 182 रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरीतील नवीन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, शहरातील 23 रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरातील 214 सक्रिय रुग्णांपैकी तब्बल 201 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. केवळ त्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आहेत. पण, कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत.

तर, सात रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत. सहा कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.