Pimpri : उद्या सामुदायिक रेडिओ स्टेशनच्या स्टुडिओचे उदघाटन

एमपीसी न्यूज – प्रजापिता ब्रम्हकुमारीज पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने सामुदायिक रेडिओ स्टेशनचे पुणेरी आवाज 107.08 या स्टुडिओचे उदघाटन जागतिक दर्जाच्या व्याख्यात्या बी.के. शिवानी यांच्या हस्ते रहाटणीत होणार आहे.

रहाटणी येथील वर्ल्ड रिन्युअल स्पिरिट्युअल ट्रस्ट, लाईट हाऊस येथे उद्या मंगळवार दि. 12 मार्चला सकाळी दहा वाजता हे उदघाटन होणार आहे. यावेळी यशस्वी आणि आनंदी या विषयावर त्या बोलणार आहे.

  • यावेळी ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ , खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, संजय भेगडे, पुण्याच्या इनचार्ज बी. के. उर्मिला आदी उपस्थित राहणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.