Pimpri : पोलीस कर्मचाऱ्यांचे वेतन कपात न करता तातडीने द्यावे – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या लढाईत महत्वाचे काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे वेतन कपात केले जाणार नाही, असे शासनाने जाहीर केले.  परंतु, अद्यापपर्यंत पोलिसांना वेतन मिळालेले नाही, तसेच मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांची सर्व एस. पी. कडून ट्रेझरीकडे पाठविण्यात आलेले पे बिले 25टक्के कपात करून पाठविण्यात आलेले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांचे वेतन कोणत्याही प्रकारे प्रशासकीय विलंब व कपात न करता तातडीने द्यावे, अशी मागणी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

सद्यस्थिती पोलिसांना वेतन मिळालेले नाही.  जे मिळेल  ते 25 टक्के कपात करून खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे जाहीर झालेल्या  टाळेबंदीत पोलीस आपला जीव धोक्यात राहून दिवस रात्र काम करीत आहेत.  अशावेळी त्यांचे मनोबल खच्चीकरण होणार नाही, याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे‌.

त्यामुळे पोलिसांना पूर्ण वेतन मिळेल याची काळजी स्वतः मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मुख्यमंत्री  ठाकरे यांच्याशी संपर्क करून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.