Pimpri : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक

एमपीसी न्यूज –  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रविवार (दि. १४ एप्रिल) रोजी जयंती आहे. पिंपरी चिंचवड शहरातही दरवर्षी आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केली जाते. पिंपरीतील डॉ. आंबेडकर चौक येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
या पार्श्वभूमीवर पिंपरी पोलीस ठाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शांतता कमिटीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीस पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस  निरीक्षक कल्याण पवार, गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक उंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्वर शेख, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अमित बच्छाव, राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड व्यापारी सेलचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, अलोक गायकवाड व सर्व समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

  • सभेला सुरूवात करतांना पिंपरी पोलीस स्टेशनचे निरिक्षक पवार यांनी उपस्थितांना सूचना मांडण्याची विनंती केली. डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. कोणतीही नशा न करता शांततेच्या मार्गाने मिरवणूक काढण्याचे आवाहन त्यांनी केले.
बैठकीस उपस्थित अमित बच्छाव व आदींनीही आपले मनोगत व्यक्‍त करून, मिरवणूक शांततेत पार पाडण्याचा निर्धार यावेळी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.