Pimpri : रसिक मित्र मंडळातर्फे उद्या कैफी आझमी यांच्यावर व्याख्यान

एमपीसी न्यूज – रसिक मित्र मंडळातर्फे ख्यातनाम उर्दू शायर कैफी आझमी यांच्यावर व्याख्यान आयोजित केले आहे. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, उर्दू अभ्यासक अनीस चिश्ती सहभागी होणार आहेत.

पत्रकार संघ सभागृहात गुरुवारी (दि. 21 नोव्हेंबर) सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम साजरा करण्यात एणार आहे. रसिक मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला यांनी ही माहिती दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.