Pimpri : पिंपरीत रेडिमेड कपडे, ऑप्टिकल्सच्या दुकानाला आग

एमपीसी न्यूज – पिंपरी कॅम्पमध्ये कपड्याच्या दुकानाला आग लागली. आग एका दुकानातून अन्य दुकानांमध्ये पसरली. त्यात कपडे, ऑप्टिकल्स आणि मेन्स पार्लर अशी तीन दुकाने जळाली. ही घटना आज, मंगळवारी (दि. 28) दुपारी बाराच्या सुमारास शगुन चौक, पिंपरी येथे घडली.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी बाराच्या सुमारास मुख्य अग्निशमन केंद्राला पिंपरी पोलीस चौकीतून शगुन चौकात आग लागल्याची वर्दी मिळाली. त्यानुसार मुख्य अग्निशमन केंद्राचे तीन, रहाटणी आणि प्राधिकरण उपकेंद्राचे प्रत्येकी एक असे एकूण पाच बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले.

उप अग्निशामक अधिकारी ऋषिकांत चिपाडे, अशोक कानडे, लिडिंग फायरमन संजय ठाकूर, प्रतीक कांबळे, फायरमन विजय घुगे, संभाजी दराडे, निखिल गोगवले, सारंग मंगरूळकर, विकास भोंगाळे, अंकुश बडे, भाईदास, सचिन माने, हनुमंत होले, वाहन चालक गोविंद सरोदे, विशाल फडतरे, नीळकंठ दुबे, राजाराम लांडगे, संतोष सरोटे यांच्यासह एकूण 30 जवान घटनास्थळी दाखल झाले.
न्यू हरिष किड्स अँड मेन्स वेअर रेडिमेड कपडे, राम ऑप्टिकल्स, पियुष मेन्स वेअर ही तीन दुकाने आगीत जळाली आहेत. जवानांनी अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. वेळेत आग आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला आहे. आगीचे नेमके कारण आणि नुकसान याबाबत माहिती मिळू शकली नाही. घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.