Pimpri : स्वच्छता स्पर्धेत नेहरूनगर दवाखाना, रागा इम्पेरियो, महिंद्रा एँथिया सोसायटी, दिघी कन्या शाळा प्रथम

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्वच्छ महाराष्ट्र /भारत अभियान (नागरी) प्रकल्प अंमलबजावणी कक्ष यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत स्वच्छता स्पर्धांचा (तृतीय लीग) निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात प्रथम क्रमांकावर दवाखाने/हॉस्पीटलमध्ये म.न.पा. नेहरुनगर दवाखाना, स्वच्छ हॉटेलमध्ये मिरॅकल व्हेंचर अर्थात रागा इम्पेरियो), ताथवडे , स्वच्छ गृहनिर्माण संस्थामध्ये महिंद्रा एँथिया सोसायटी खराळवाडी ( क क्षेत्रीय कार्यालय) आणि स्वच्छ शाळामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दिघी कन्या प्राथमिक शाळा दिघी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०२० शहरांमध्ये सुरु झाले आहे. या सर्वेक्ष्‍णाचा प्रमुख हेतू आहे की, व्यापक स्वरुपात नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग स्वच्छ भारत अभियानामध्ये घेणे व याकरिता त्यांच्यामध्ये माहिती, शिक्षण व संवादाद्वारे त्यांच्या वर्तनातील बदल घडवणे.

याकरिता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रामधील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ हॉटेल्स, शाळा, हॉस्पिटल्स, गृहनिर्माण संस्था /मोहल्ला मार्केट / मंडई या सहा गटामध्ये स्वच्छता स्पर्धांचे ‍तृतीय लीग (ऑक्टोबर ते डिसेंबर) आयोजन केले होते.

या अंतर्गत हॉस्पीटल्स, शाळा, हॉटेल्स, गृहनिर्माण संस्था / मोहल्ला मार्केट / मंडई यांना या स्पर्धेमध्ये –तृतीय लिग (ऑक्टोबर ते डिसेंबर) सहभागी होण्याकरीता आवाहन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे परिसर स्वच्छता, शौचालय सुविधा, स्वच्छता साधनांचा वापर, ओला व सुका कचरा कचरा वर्गीकरण, पायाभुत सुविधा, स्वच्छता ऍप डाऊनलोड आदी निकषांचे आधारे गुणांक देण्यात आले आहे.

या स्वच्छता स्पर्धेमध्ये महापालिका कार्यक्षेत्रातील संस्थांनी सहभाग घेतला. स्पर्धेकरता अर्ज व इतर माहिती हॉटेल्स व रुग्णालया करीता वैदयकिय विभाग, शाळाकरिता शिक्षण मंडळ, व गृहनिर्माण संस्था / मोहल्ला मार्केट / मंडई याकरिता क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहेत. यामध्ये म.न.पा.चे कार्यक्षेत्रातील खासगी व मनपा रुग्णालये / दवाखाने , हॉटेल्स, गृहनिर्माण संस्था, खासगी आणि पालिका शाळा यांचा प्राप्त झालेल्या अहवालातील गुणांकनानुसार गुणक्रमांक काढण्यात आलेला असून त्याचा निकाल पुढीलप्रमाणे :

दवाखाने / हॉस्पीटल :-
१. म.न.पा. नेहरुनगर दवाखाना – प्रथम क्रमांक
२. म.न.पा.आकुर्डी रुग्णालय आकुर्डी – द्वितीय क्रमांक
३. म.न.पा. केएसपीएच/तालेरा रुग्णालय – द्वितीय क्रमांक
४. यशवंतराव चव्हाण स्मृ,रुग्णालय पिंपरी – द्वितीय क्रमांक
५. प्रेमलोक पार्क दवाखाना चिंचवड – तृतीय क्रमांक

  • स्वच्छ हॉटेल :-
    १. मे.मिरॅकल व्हेंचर अर्थात रागा इम्पेरियो, ताथवडे पुणे ३३– प्रथम क्रमांक
    २. मे.बिग ट्री रेस्टॉरंट वाकड पुणे ५७– द्वितीय क्रमांक
    ३. मे. एम्पायर गार्डन पिंपरी पुणे ४११०१८– तृतीय क्रमांक

स्वच्छ गृहनिर्माण संस्था :-
१. महिंद्रा एँथिया सोसायटी खराळवाडी ( क क्षेत्रीय कार्यालय) – प्रथम क्रमांक.
२. स्वप्नपुर्ती फेज १ से २६ जवळ निगडी प्राधिकरण ( अ क्षेत्रीय कार्यालय) – द्वितीय क्रमांक
३. प्रेमसागर हौ. सोसायटी चिंचवड स्टेशन ( अ क्षेत्रीय कार्यालय) – तृतीय क्रमांक

  • स्वच्छ शाळा :-
    १. पिं.चि.मनपाचे दिघी कन्या प्राथ. शाळा दिघी – प्रथम क्रमांक
    २. रिव्हर डेल स्कुल इंद्रायणीनगर भोसरी पुणे – १६ – प्रथम क्रमांक
    ३. श्री स्वामी समर्थ सेमी इंग्लीश स्कुल इंद्रायणीन नगर – प्रथम क्रमांक
    ४. अभिषेक इंटरनॅशन स्कुल – मोशी – प्रथम क्रमांक
    ५. मोतीलाल तालेरा – इंद्रायणीनगर – प्रथम क्रमांक
    ६. प. वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय- ने.नगर – प्रथम क्रमांक
    ७. उर्दु मुला-मुलींची शाळा प्राथमिक शाळा – द्वितीय क्रमांक
    ८. राजीव गांधी माध्य. विद्यालय, ने.नगर – द्वितीय क्रमांक
    ९. पिं.चि.मनपाचे माध्य.वि.लांडेवाडी भोसरी – तृतीय क्रमांक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.