Pimpri : रोटरी क्लब ऑफ निगडीने दिली सुरक्षारक्षकांना सावली

एमपीसी न्यूज – निगडी – दापोडी बीआरटी मार्गावरील उन्हांत उभे राहणा-या ट्राफिक वॉर्डनसाठी रोटरी क्लब ऑफ निगडीने प्रोटेक्शन बुथ दिला आहे. त्यामुळे ट्राफिक वॉर्डनचे उन्हांपासून संरक्षण होणार आहे. रोटरी क्लब ऑफ निगडीने दिलेल्या संरक्षण बुथ दिल्यामुळे ट्रॉफिक वॉर्डनने रोटरीचे आभार मानले आहे.

निगडी- दापोडी बीआरटी मार्ग उन्हातच उभे राहून कर्तव्य बजावावे लागते. उभे राहण्यासाठी साधी बूथचीही सोय प्रशासनाकडून करण्यात येत नाही. सुविधेअभावी ट्रॉफिक वॉर्डनची गैरसोय होत होती. बीआरटी मार्गात बसायला खुर्ची नाही. ऊन-पावसापासून संरक्षणासाठी छत नाही, हे लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ निगडीने सुरक्षारक्षकांना प्रोटेक्शन बुथ देऊन सावली दिली आहे.

  • निगडी ते दापोडी मार्गात बीआरटी मार्गातील प्रवास सुखकर आणि जलद होण्यासाठी ट्रॉफिक वॉर्डन व्यवस्था बजावत आहेत. उन्हातच बारा तास उभे राहून कर्तव्य पार बजावावे लागत असल्याने त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. उन्हापासून बचाव करण्याची उपाययोजना नसल्याने त्याचा त्रास सहन करावा लागत होता. यावेळी रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुभाष जयसिंघानी, सर्व्हिस डायरेक्टर रो. गुरुदीप भोगल आदी रोटरीयन सदस्य उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.