Pimpri : ‘शिवक्रांती’च्या वतीने देशमुख वाडी येथे ‘आदिवासी’ बांधवांना कपडे, फराळ वाटप

एमपीसी न्यूज – दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाने मिळवलेल्या विजयाचा उत्सव होय. याच निमित्ताने शिवक्रांती समाजसेवा संस्थेच्या वतीने खेड तालुक्यातील देशमुख वाडी येथील आदिवासी समाजातील बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष अमित शंकर शिंदे व सर्व पदादीकार्याच्या वतीने गरजू महिला, मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांना नवीन कपडे, फराळचे वाटप केले.

यावेळी संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष अमित शंकर शिंदे, सचिव सोनाली पिंगळे, स्वप्नजा नामवाड, अमोल नामवाड, सरस्वती टमाट्टा,वैभव पिंगळे, दीपाली पठारे, अरुण बोरुडे,विजय पिंगळे, अमृता टमाट्टा, नवनाथ देशमुख, वहिद सय्यद, वर्षा पिंगळे, रुपाली शिर्के, अरुण शर्मा, शैलेश कडू, संजय सोनार इत्यादी मान्यवरांच्या उपस्थिती उपक्रम साजरा झाला. आदिवासी बांधवांसोबत दिवाळीचा सण साजरा करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व हसू आणण्याचा प्रयत्न संस्थेने करण्याचा प्रयत्न केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.