Pimpri : पंचनामा न झाल्याने पाच मृतदेह सहा तास शवगृहातच!; नातेवाईकांची शवविच्छेदन गृहाच्या बाहेर गर्दी

मृत्यूनंतर 'त्या' पाच जणांना प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा त्रास;

एमपीसी न्यूज – पिंपरीमधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात पाच मृतदेह पंचनामा न झाल्याने सात तास ठेवले. मृत्यूनंतर देखील त्या पाच जणांना प्रशासनाचा हलगर्जीपणा सहन करावा लागत आहे. हा प्रकार आज (मंगळवारी) घडला आहे. विशेष म्हणजे त्यातील तीन मृतदेह दीर्घ आजाराने निधन झाल्याचे आहेत.

शाहूनगर येथील 60 वर्षीय व्यक्ती (सुभाष पांडुरंग सोनवणे) यांचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. सोबत नातेवाईक आले. सोनवणे यांच्या मृत्यूची माहिती नातेवाईकांना रात्री मिळाली. दुःखद घटना घडल्याने काही नातेवाईक घाईघाईत रात्री आले. तर काही नातेवाईक सकाळी पोहोचले.

  • रामनगर येथील इंद्रभान आनंद भोर (वय 72) आणि सोनाबाई बापू विटकर (वय 75) यांचे देखील दीर्घ आजराने निधन झाले. त्यांचेही मृतदेह वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले. त्याचबरोबर आणखी दोन ते तीन मृतदेह आले आहेत. पण, सकाळपासून एकही शवविच्छेदन झाले नाही. सर्व मयताचे नातेवाईक शवविच्छेदन गृहाच्या बाहेर सकाळपासून उभे आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात शवविच्छेदनासंबंधित अहवाल बनविण्यासाठी दररोज एका पोलीस ठाण्याच्या टीमने जाण्याचा नियम बनविण्यात आला आहे. त्या नियमानुसार आज तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचा नंबर होता. मात्र, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याची टीम दुपारी दोनपर्यंत पोहोचले नाही. मृतांच्या नातेवाईकांनी पोलीस नियंत्रण कशाला संपर्क केला. तळेगाव दाभाडे पोलिसांना संपर्क केला. पण, त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. नातेवाईकांनी शवविच्छेदन गृहाच्या बाहेर गर्दी केली आहे.

मयत सुभाष सोनवणे यांचे नातेवाईक भगवान मुळे म्हणाले, “आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून डेड हाऊसला आलो आहोत. सकाळपासून पोलीस नसल्यामुळे आम्हाला ताठकळत थांबावे लागत आहे. पोलिसांनी अहवाल बनविल्याशिवाय डॉक्टर शवविच्छेदन करीत नाहीत. पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क केला असता पोलीस येत असल्याचे त्यांच्याकडून सकाळपासून सांगण्यात येत आहे. पण, सहा तास उलटले तरी पोलीस अजूनही पोहोचले नाहीत. सर्व नातेवाईक घरी वाट बघत आहेत. दुःखाच्या प्रसंगी अशी अवहेलना सहन करायला लागत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.