Pimpri: अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा – अमित गोरखे

The state government should send a proposal to the Center to give Bharat Ratna to Anna Bhau Sathe - Amit Gorkhe : महाराष्ट्राच्या सर्वस्तरातून अण्णा भाऊंना भारतरत्न द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

एमपीसी न्यूज – साहित्य क्षेत्रातील स्वतः एक विद्यापीठ असलेले साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे 2020 हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभरातून साहित्यरत्न ‘अण्णा भाऊं’ना भारतरत्न मिळावा, अशी मागणी होत आहे. त्याची दखल घेत राज्य सरकारने अण्णा भाऊंना भारतरत्न देण्याचा ठराव मंजूर करुन केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी मागणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष, भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केली आहे.

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे 2020 हे जन्मशताब्दी वर्ष आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वस्तरातून ‘अण्णा भाऊं’ना भारतरत्न द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

पिंपरी-चिंचवड मधील तमाम साहित्यिक व समाजाच्या वतीने ‘अण्णा भाऊं’ना भारतरत्न देण्याची मागणी गोरखे यांनी केली आहे.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी सुद्धा या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रव्यवहार केला आहे, असेही गोरखे यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.